पश्चिमी विक्षोपाच्या कारणामुळे देशभरासह जिल्ह्यत थंडीचा कडाका वाढला आहे.आज पहाटे तापमान ६.५ पर्यंत खाली गेले असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी ठीक ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे दिसून आले. उद्या पासून थंडीचा कडाका कमी होणार आहे.मात्र ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाची शक्यता व १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान ढगाळ वातावरण राहू शकते अशी शक्यता चिखलठाणा वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे.
मागील दोन दिवसापासून शहरासह जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. पश्चिमी विक्षोपा मुळे वातावरणात थंडीची लाट आहे. उद्या पासून जिल्ह्यातील थंडी कमी होण्यास सुरुवात होईल. येत्या ११,१२ आणि १३ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यत ढगाळ वातावरण राहणार आहे. शिवाय काही ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो. व १५ ते १८ फ्रब्रुवारी दरम्यान वातावरणात पुन्हा बदल होण्याची संकेत आहे. या दरम्यान ढगाळ वातावरण राहू शकते. अशी शक्यता चिकलठाणा वेधशाळेने वर्तविली आहे.
तीन दिवस राहणार ढगाळ वातावरण
पश्चिमी विक्षोपमुळे थंडी ची लाट आहे. येत्या काही दिवसात वातावरणात बदलाचे संकेत आहेत.११ ते १४ फ्रब्रुवारी दरम्यान ढगाळ वातावरण व तुरळक पावसाची शक्यता आहे .तर १५ ते १८ फ्रब्रुवारी दरम्यान ढगाळ वातावरण राहील.
- पंढरीनाथ साळवे पाटील.
चिकलठाणा वेधशाळा प्रमुख